सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (21:24 IST)

विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार

voting
येत्या २६ फेब्रुवारीला पुणे जिल्ह्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पाठोपाठ काँग्रेसने बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली. कसबापेठ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून ६ उमेदवार इच्छुक आहेत. या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून महाविकास आघाडीच्या उद्याच्या बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
 
दोन पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी अशी आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली. कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे ६ इच्छुक उमेदवार आहेत. ही नावं हाय कमांडकडे पाठवली जातील आणि त्याचा निर्णय घेतला जाईल. या दोन्ही जागांसाठी आमची आघाडी असल्याने एकत्रितपणे निवडणूक लढवली जाईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor