सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (15:21 IST)

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश

raj thackeray shinde
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे गटाने पनवेलमध्ये मनसेला खिंडार पाडल्याचे दिसून येत आहे. पनवेल, उरणमधील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मुंबईतील मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात हा पक्ष प्रवेश झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
 
मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहे.  उरण आणि पनवेलमधील मनसे खारघरची पूर्ण टीम शिंदे गटात दाखल झाली आहे.