मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (21:26 IST)

मराठी गाणे वाजवण्यास नकार दिल्यामुळे मनसेने व्यवस्थापकाला मारहाण केली

hotel loby
मराठी गाणे वाजवण्यास नकार दिल्यामुळे मनसेने वाशी येथील हॉटेल 'द टेस्ट ऑफ पंजाब'च्या व्यवस्थापकाला काल मारहाण केली. यानंतर हाॅटेल मालकानेही आज खुलासा करीत आपण मराठीच आहोत. गैरसमजूतीतून गाणे वाजवले गेले नव्हते, पण नंतर गाणे वाजवल्याचे स्पष्ट करीत घडलेल्या प्रकारावर आपली दिलगिरीही व्यक्त केली.
 
वाशी येथील एका हाॅटेलमध्ये एका खासगी कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इव्हेंट ऑर्गनायझरसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणे वाजवण्याच हाॅटेलचालकाला विनंती केली. परंतु, मराठी गाणे वाजवण्यास या हाॅटेल व्यवस्थापकाने नकार दिला. यानंतर मनसे कार्यकर्ते तिथे पोहचले व त्यांनी हाॅटेल व्यवस्थापकाला जाब विचारत कानशिलात लगावली यानंतर मारहाणही केली.
 
हाॅटेलमध्ये मराठी गाण्यांवर बंदी?
 
प्राप्त माहितीनुसार, वाशी येथील हाॅटेलवर मराठी गाणे वाजवण्यास बंदी असल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी हाॅटेल व्यवस्थापकाला मारहाण झाली. तत्पुर्वी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणे वाजवण्याची विनंती केल्यानंतर या हाॅटेलमध्ये मराठी गाणे वाजवण्यास बंदी असल्याचेही त्यांना सांगण्यात आले होते.
 
हाॅटेल मालक महाराष्ट्रीयनच
 
ज्या मनसे कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये मराठी गाणे वाजवले नाही म्हणून हाॅटेल व्यवस्थापकाला मारहाण केली. त्यानंतर हाॅटेल मालकाचा खुलासा आला असीून आपण मराठीच आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. मराठी आणि महाराष्ट्रात राहूनही मराठी गाणे वाजवले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यावरही त्यांनी खुलासा दिला आहे.
 
मग झाला झिंगाट नाच..
मनसेकडून जाब विचारत मारहाण झाल्यानंतर हाॅटेलमध्ये मराठी गाणे वाजवण्यात आले. विशेषःत झिंगाट हे अस्सल मराठी गाणे लावून नाचही झाला अशी माहितीही समोर आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor