सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (14:29 IST)

रणजीत सावरकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. दुसरीकडे सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी या सर्व पार्श्वभूमीवर रणजीत सावरकरांनी शनिवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवास  ‘स्थानी भेट घेतली.
 
रणजीत सावरकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली. यावेळी नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी सविस्तर माहिती समोर आलेली नाही. ही सदिच्छा भेट असल्याचं मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगण्यात आलं आहे. मात्र, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पुढील कार्यवाहीसंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसेकडूनही राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या शेगावमधील सभेला विरोध करण्यात आला होता. यासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही मनसे नेत्यांना पलिसांनी चिखलीमध्ये ताब्यात घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर रणजीत सावरकर आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
 
“राहुल गांधींच्या विरोधात महाराष्ट्रभर निषेधाची आंदोलनं झाली. त्यात सर्वात मोठं आंदोलन मनसेनं केलं. त्यांचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या शेगावमधील सभेतही गेले. तिथे त्यांनी काळे झेंडे फडकावले. त्यासाठी मी राज ठाकरेंचे आभार माननण्यासाठी त्यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी राहुल गांधींचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं”, अशी प्रतिक्रिया रणजीत सावरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor