मनसेची निवडणूक तयारी सुरु
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. १ आणि २ ऑक्टोबर रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा पुणे दौरा असणार आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात मनसे शाखा अध्यक्षांचा मेळावा होणार आहे.
दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरे हे देखील १ ते ३ ऑक्टोबर रोजी कल्याण डोंबिवली दौरा करणार आहेत. आगामी महानगरपालिका आणि संघटनात्मक बांधणीसाठी हा दौरा असणार आहे.
पुणे महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपलं संपूर्ण लक्ष पुण्यावर केंद्रीत केलंय. राज ठाकरे यांचा हा आठवा पुणे दौरा आहे.