बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (08:18 IST)

रस्त्यावरील खड्डे प्रश्नी मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक

मुंबईतील कल्याण-डोंबिवलीत अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक मंदावलेली आहे. पावसामुळे खड्ड्यांची समस्या आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावरुन आता मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक झाले आहे.
 
आमदार राजू पाटील यांनी कल्याणमधील चक्की नाका ते नेवाळी रस्त्याची पाहणी केली. यावेळी पालिका अधिकारी देखील उपस्थित होते. रस्त्यांची अवस्था पाहून राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. 
 
सहनशीलतेचा अंत झालाय, 15 दिवसात खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरू असा दम आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांना भरला आहे. आमदार राजू पाटील यांनी यावेळी पालिकेवर सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर ही टीका केली आहे.