शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2022 (15:34 IST)

मशीदीतही सीसीटीव्ही लावण्याची मनसेची मागणी

भोंग्यांचा विषय देशभर गाजत असतानाच मनसेकडून आता CCTV च्या मुद्द्यावर भर देण्यात आला आहे. मनसेने सीसीटीव्ही यंत्रणेच्या निमित्ताने सरकारला काही प्रश्न केले आहेत. तसेच सीसीटीव्हीच्या निमित्ताने सरकारने नियमावली तयार करण्याचेही आवाहन मनसेने केले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक ट्विट करत आता मशीदीतही सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे.
 
जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का? “सर्वधर्मीय” प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये?हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी.