1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 नोव्हेंबर 2020 (16:02 IST)

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणतात, मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे कृष्णकुंज

MNS leader Sandeep Deshpande
कोरोना अन लॉकनंतरही अद्याप विविध व्यवसायांवर निर्बंध आहेत. तर, आतापर्यंत अनेक व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर  काही दिवसांपासून  संबंधित व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिनधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे जाऊन, भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले होते. यावर राज ठाकरे यांनी पुढाकर घेत, अनेकांच्या अडचणी सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले.
 
या पार्श्वभूमीवर मनेसे नेत संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. ”समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28” असं संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.