शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (08:33 IST)

महाराष्ट्रासाठी चांगली बातमी, कोरोनाच्या रुग्ण संख्येत इतकी टक्के घट, केंद्र सरकारची माहिती

महाराष्ट राज्यासाठी थोडी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एका बाजूला देशात मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा सर्वाधित फटका हा महाराष्ट्राला बसला आहे असे आकडे समोर येत आहेत. मात्र आता केंद्रीय आरोग्य विभागानं सादर केलेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. या आठवड्याच्या संख्येच्या आधारावर गेल्या तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये ७ टक्क्यांची घट झाली आहे. ही माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. त्यांनी हि माहिती आरोग्य विभागाच्या आयोजित पत्रकार परिषदेत  दिली आहे. 
 
सोबतच त्यांनी माहिती देतानां सांगितले की, देशात सध्या करोनाच्या चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत देशात ४ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक चाचण्या केल्या आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ११ लाख ७२ हजार चाचण्या करण्यात आल्या. तर आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्याही वाढून २९ लाख ७० हजारांवर पोहोचली असल्याचे राजेश भूषण म्हणाले. 
 
सध्या पाच राज्यांमध्ये अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या अधिक असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. सोबतच तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात मिळून एकूण अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या ६२ टक्के केसेस आहेत. तसंच आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात या राज्यांमध्येच एकूण मृत्यूंच्या ७० टक्के मृत्यू झाल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली.