गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (08:46 IST)

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना कोरोना

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सीएम खट्टर यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. सीएम खट्टर यांनी गेल्या एका आठवड्यात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन होण्याचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सीएम खट्टर यांनी गेल्या सात दिवसांत थेट संपर्कात आलेल्या सर्व लोकांनाची ही चौकशी केली आहे.
 
मुख्यमंत्री खट्टर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज कोरोना टेस्ट झाली होती, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या कर्मचार्‍यांना कोरोना टेस्ट करण्यास सांगितले आहे.'
 
महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर खट्टर यांनी स्वत:ला क्वारंटाई केले होते. एसवायएलच्या बैठकीत खट्टर यांनी शेखावत यांची भेट घेतली होती. 20 ऑगस्ट रोजी गजेंद्रसिंग शेखावत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कुरुक्षेत्रचे खासदार नायबसिंग सैनी यांनीही मुख्यमंत्री खट्टर यांची भेट घेतली होती.