1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (08:19 IST)

वाचा, लॉकडाउनविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले ?

cm uddhav thackeray
“राज्यात लॉकडाउन उठवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानंच राबवली जाणार आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. “कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही,” असंही ते म्हणाले.
 
“लॉकडाउनमधून कधी बाहेर येणार यापेक्षा लॉकडाउन कसं हटवणार हे महत्त्वाचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील कोविड-१९ टास्क फोर्सटे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्या मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. तसंच लॉकडाउन उठवण्यासाठी घाई करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
कोरोनाची लागण कोणालाही होऊ शकते. या परिस्थितीमध्ये अतिआत्मविश्वास बाळगणं योग्य नाही. राज्यात कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. परंतु आता दुसरी लाट येऊन द्यायची नाही. त्यामुळेच संपूर्ण लॉकडाउन उठवण्याऐवजी मिशन बिगीन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्यानं लॉकडाउन उठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.