'महाराष्ट्र सायबर’ मध्ये इंटर्नशीपची सुवर्णसंधी
महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा [email protected] या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे दि. 12/08/2020 पर्यंत पाठवावा.
यासाठीचा पत्ता : The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai-400 005
इंटर्नशीपसाठी नियम, अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत..
उमेदवारास संगणकीय तांत्रिक ज्ञान असावे व त्याचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. संभाषण व लेखन कौशल्य असावे.
इंटर्नशीपचा कालावधी 6 महिन्यांचा असेल. विहित कालावधी संपेपर्यंत उमेदवाराला इंटर्नशीप सोडता येणार नाही. (अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकारी यांची परवानगी आवश्यक)महाराष्ट्र सायबर, मुंबई या कार्यालयामध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज करावेत . कृपया या संदर्भातील पात्रता, निकष, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी अपलोड केलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.@DGPMaharashtra #internships #CyberSecurity pic.twitter.com/H9JbuYQHo0
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) August 8, 2020
महाराष्ट्र सायबरकडून उमेदवारास कोणताही भत्ता, प्रवास भत्ता देण्यात येणार नाही.
महाराष्ट्र सायबरच्या कार्यालयात उमेदवारास कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे लागेल.
महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयांसाठीचे गोपनियतेसंदर्भातील सर्व नियम व कायदे यांचे पालन उमेदवारास कसोशीने करावे लागेल.
कार्यालयीन कोणतेही विषय/माहिती यांचा गैरवापर करणे, फेरफार करणे, ताब्यात घेणे असे गैरप्रकार उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाहीत असे महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेमार्फत कळविण्यात आले आहे.
