1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
  4. Purple Idli Recipe

Purple Idli Recipe पारंपरिक इडलीला द्या हटके ट्विस्ट, बनवा रंगीत ''पर्पल इडली''!

नाश्त्यासाठी बनवा हटके आणि पौष्टिक पर्पल इडली जीची चव आणि रंग पाहून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच होतील खुश! नैसर्गिक जांभळ्या रंगाची सॉफ्ट आणि हेल्दी इडली  मुलांना खूप आवडते!
 
साहित्य-
इडली रावा / इडली बॅटर – 2 कप (तयार बॅटर वापरू शकता)
जांभळी कोबी (पर्पल कॅबेज) – 1 कप (बारीक किसलेली किंवा ब्लेंड केलेली)
मीठ – चवीनुसार
इनो / बेकिंग सोडा – ½ टीस्पून (गरज असल्यास)
पाणी – थोडे (बॅटर पातळ करण्यासाठी)
अतिरिक्त (ऑप्शनल):
गाजर / बीट थोडे (रंगासाठी)
तेल – ग्रीस करण्यासाठी
 
कृती-
सर्वात आधी पर्पल कॅबेज तयार करा. जांभळी कोबी बारीक किसून घ्या किंवा थोडे पाणी घालून स्मूथ पेस्ट ब्लेंड करा. बॅटर मिसळा तयार इडली बॅटरमध्ये कोबीची पेस्ट घाला व चांगले मिसळा. तसेच मीठ तपासा. बॅटर थोडे घट्ट असेल तर थोडे पाणी घाला. आता इनो किंवा बेकिंग सोडा टाकून हलके मिसळा. आता इडली स्टीमरमध्ये साचे ग्रीस करून बॅटर भरा.व १५ मिनिटे स्टिम करा. गरम गरम नारळ चटणी, पोडी मसाला किंवा सांबारसोबत खा.
टिप्स
जास्त जांभळा रंग हवा असेल तर कोबी जास्त घाला.
तयार बॅटर नसेल तर उडीद डाळ + इडली रावा पारंपरिक पद्धतीने भिजवून बॅटर बनवा आणि नंतर कोबी मिसळा.
मुलांसाठी छोटे आकारात बनवा – खूप आकर्षक दिसतात.
बीटरूट वापरल्यास गुलाबी-पर्पल रंग येतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पुढील लेख
हिवाळ्यासाठी आरोग्यदायी आहार: हिवाळ्यात कोणती फळे आणि भाज्या खाव्यात?