रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (12:14 IST)

5 दिवसात चीनकडून 40300 सायबर हल्ले; महाराष्ट्र सायबर सेलने केलं अलर्ट

गेल्या 4-5 दिवसात सायबर स्पेसमध्ये चीनकडून सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये इन्फॉर्मेशन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि बँकिंग यासारख्या विभागांना सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारचे किमान 40,300 सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले. चीनच्या चेंगदू भागातून सायबर अटॅकचे सर्वाधिक प्रयत्न झाले’, अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे स्पेशल आयजी यशस्वी यादव यांनी दिली.
 
महाराष्ट्र सायबर विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर विभाग चिनी सायबर हल्ल्यांविरोधात मोठ्या प्रमाणात फिशिंग हल्ल्याची योजना तयार करीत आहे. याबाबत महाराष्ट्र सायबर विभागाने एडवायजरी जारी केली आहे.
 
या अंतर्गत लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे-
कोविड - 19 ची मोफत तपासणी किंवा तत्सम संदेश येत असल्यास त्यावरही क्लिक करू नये
[email protected] किंवा ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर कोणताही ईमेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करु नये.
आकर्षित करणारा किंवा आर्थिक प्रलोभन देणारा विषय असलेला ईमेल ओपन करु नये.
Free Covid Test, Free Covid-19Kit अशा विषयाच्या मेलवरील लिंक किंवा अटॅचमेंट डाउनलोड करु नये.
सोशल मीडियावरुन आलेल्या संदेशातील लिंक खात्री केल्याशिवाय ओपन करू नये
माहिती नसलेल्या संकेत स्थळावर बँकेची माहिती देऊ नये
मेलवरुन सुरक्षित संभाषण तसेच सुरक्षित यंत्रणेचा वापर करा.