शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (21:51 IST)

विदर्भात मनसेला गळती, अतुल वांदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर

विदर्भात मनसेला गळती लागण्याची चिन्हे आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्षच आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.हा   विदर्भात मनसेला मोठा झटका मानला जात आहे. 
 
विदर्भातील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत. अतुल वांदिले हा विदर्भातील ओबीसीचा मोठा चेहरा आहे. उद्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात ते घेणार प्रवेश  करणार आहेत.
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्या राष्ट्रवादीत अतुल वांदिले हे 40 पदाधिकाऱ्यासोबत प्रवेश  करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हिंगणघाट तालुक्यातील काही सदस्य ,सरपंच आणि पदाधिकारी अतुल वांदिले यांच्या सोबत प्रवेश घेणार असल्याची माहिती आहे.