शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (12:07 IST)

मनसेकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्कवर भव्य मेळाव्याचे आयोजन

maharashatra navnirman sena
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्क येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात येतो. मात्र आगामी मुंबई, नाशिक, पुण्यासह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. यासाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे, याच सर्व घडमोडींवर चर्चा करण्यासाठी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मनसेची बैठक पार पडली. वांद्र्यातील एमआयजीमध्ये झालेल्या या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीत मार्गदर्शन केले आहे. यावेळी गुढीपाडव्याला मनसे शिवतीर्थावर मोठं शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.
 
या बैठकीत 21 मार्चला मनसे शिवाजी पार्कवर तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच शिवतीर्थावर मनसे मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः हजर राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालणार असल्याचेही म्हटले जातेय. राज्यातील पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे यंदा गुढीपाडवा सण मोठ्या दणक्यात साजरा करणार आहे.