मंगळवार, 3 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अवधूतने बनवले मनसेसाठी गाणे

मुंबई महापालिका निवडणुक
एकटा पडला राजा, तुमच्या राजला साथ द्या, असे भावनिक आवाहन मनसेने गाण्यामधून केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेने थीम साँग लॉन्च केले आहे.
 
मुंबईतील मनसैनिकांच्या मेळाव्यात गायक- संगीतकार अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचे थीम साँग सादर केले. मनसेने दादारमधील शिवाजी मंदिरात मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला.
 
राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या शैलीत चौफेर फटकेबाजी करत उद्धव ठाकरे, शिवसेना, भाजप, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या गाण्याने मेळाव्यात चांगलाच जोश भरला. या गाण्याला पाचवेळा वन्समोअर मिळाला.