मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची घाटकोपरमधील सभा मनसेनं उधळून लावली आहे. घाटकोपरच्या संजय गांधी नगर परिसरात नालाबाधीत झोपडपट्टीवासियांसाठी निरुपम यांची पूर्वनियोजित सभा होती. याचवेळी सभेत घुसून मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सभेच्या ठिकाणी निरुपम यांचं आगमन झाल्याबरोबर काही मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्याचबरोबर खुर्च्याही उचलून फेकल्या....