रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2017 (14:01 IST)

मनसेने रोखला कॉंग्रेसचा फेरीवाला समर्थनार्थ मोर्चा

मुंबई कॉंग्रेस ने काढलेला दादर येथे  फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते भिडले होते. यामध्ये पोलिसांनी  हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मनसे मुळे काँग्रेसचा हा मोर्चा  होऊ शकला नाही.तर सामान्य मुंबईकर र  मात्र कॉंग्रेस वर जबरदस्त चिडला आहे.फेरीवाला समर्थन का असा थेट प्रश्न विचारत आहे. संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ सकाळी दादरमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं. परंतु यावेळी मनसे कार्यकर्ते तिथे दाखल झाले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर बटाटे फेकून विरोध केला. पोलिसांना वाटले की  यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण होवू शकतो त्यामुळे पोलिसांनी निरुपम यांच्या घरासमोरील सर्व कार्यकर्ते ताब्यात घेतले आहे. तरीही मनसे कार्यकर्त्यांनी काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांना चोपले आहे. मनसे ने हा मोर्चा उधळून लावला आहे. मात्र फेरीवाला मुळे मुंबईत जर अनेक लोकांचे जीव गेले त्यांना समर्थन कॉंग्रेस करत आहे. यामुळे नागरिक संतापले आहे.