बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अजितदादा दिलखुलास हसतात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली अजितदादांवरील ही शेरेबाजी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्या अदिती नलावडे यांना जिव्हारी लागली. त्यामुळे अदिती यांनी राज यांना प्रत्युत्तर देण्याचा चंग बांधला. त्यानंतर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने राज ठाकरेंना एक अल्बम पाठवण्यात आला.

अजितदादा हे दिलखुलास हसत असलेल्या विविध प्रसंगांतील २५ फोटोंचा हा अल्बम आहे. या अल्बमबरोबर अदिती नलावडे यांनी राज यांना एक पत्रही पाठवले आहे. तुम्हाला गंभीर वाटणाऱ्या आमच्या अजितदादांना लोकांची अधिक काळजी असते. अनेक प्रसंगात अजितदादा मनमुराद हसतात, असे अदिती यांनी पत्रात म्हटले आहे.
 
याआधी राज ठाकरे यांनी फेसबुक पेजच्या अनावरणावेळी केलेल्या भाषणात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची फिरकी घेतली होती.