बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राणे यांचा नवीन पक्ष स्थापन होणार

राज्यातील मोठे नेते नारायण राणे त्यांच्या स्वतःच्या  पक्षाची घोषणा करणार आहेत असे समोर येत आहे. राणे याबाबत 1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे घोषणा करतील असे चित्र आहे.

यामध्ये राणे यांनी  भाजपा नेत्यांच्या भेटी  घेतल्यानंतरही नेमकी काय भूमिका घेतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतच भूमिका स्पष्ट करण्यासाठी नारायण राणे 1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे सर्व कयास माध्यमात लावले जात आहेत. राणे यांची भेट भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या सोबत झाली त्या नंतर ते कोणासोबत अर्थात माध्यमांसोबत बोलले नाहीत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.