शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राणें यांच्या बाबत योग्य वेळी निर्णय होईल

सध्या नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेश बद्दल राज्यात रोज चर्चा घडत आहे. बार वर्ष कॉंग्रेस मध्ये राहून राणे बाहेर पडले आहे. यामध्ये भाजपा मध्ये प्रवेश मिळवा म्हणून अनेक दिवसापासून राणे प्रयत्न करत आहे. मात्र नेमक होतय काय? याचे नेमके उत्तर मात्र कोणालाही मिळत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राणेंच्या प्रवेशाबाबत योग्य वेळी निर्णय जाहीर करू असे सुचक विधान केले आहे. नारायण राणेंचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचे संकेत दिले आहेत. 
 
दानवे पुढे म्हणतात की नारायण राणे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. त्यावेळी अमित शहा, देवेंद्र फडणवीस सुद्धा होते. यामध्ये आम्ही अनेक विषयावर  राजकीय चर्चा केली आहे. योग्य वेळी राणेंच्या पक्षप्रवेशासंबंधीचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. यामध्ये तर शिवसेनेवर बोलताना ते म्हणाले केई  आंदोलन करणे, मोर्चे काढणे राजकीय पक्षांचे कामच राज्यात निघत असलेले मोर्चे हे सरकारविरोधी असंतोषाचे वातावरण आहे असे म्हणता येणार नाही.