सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गुजराती भाषेत शिवरायांचा इतिहास लिहिणार अमित शहा

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आता गुजराती भाषेतून लिहिणार आहेत. मागील काही दिवसापासून अमित शाह शिवरायांच्या इतिहासाचे अध्ययन करत आहेत. याबाबत महिती  राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली आरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने प्रकाशित केलेल्या अमित शहा यांच्या  ‘भारतीय जनता पक्ष राजकारणात कशासाठी?’ या पुस्तकाचं प्रकाशन  पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झाले आहे  यावेळी सहस्रबुद्धेंनी ही नवीन  माहिती दिली आहे .
 
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.