गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रोहतक , शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017 (12:33 IST)

अमित शहांच्या दौर्‍यासाठी शाळा बंद

भाजप अध्यक्ष अमित शहा सध्या हरियाणाच्या दौर्‍यावर आहेत. या निमित्ताने भाजपकडून एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळांच्या बसेसचा वापर करण्यात आल्याने रोहतक जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. शाळांच्या बसेस भाजप कार्यकर्त्यांच्या सेवेत दाखल झाल्याने विद्यार्थ्यांना शाळांकडून नाईलाजाने सुट्टी जाहीर करावी लागली. याबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे शाळांच्या बसेस राजकीय पक्षांच्या रॅलीसाठी केला जाऊ नये, असा नियम हरियाणात आहे.