रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (09:50 IST)

राज ठाकरे यांची पुन्हा एकदा व्यंगचित्रातून मोदींवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे. महात्मा गांधी यांच्या 148व्या जयंती निमित्त राज ठाकरे यांनी शुभेच्छाचित्र काढले आहे. मात्र या चित्राद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.  

यापूर्वीही  राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर व्यंगचित्राद्वारे टीका केली होती.  राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पेजवर व्यंगचित्र शेअर केलं असून यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पंतप्रधान मोदींना फरफटत आणत असल्याचं दाखवलं आहे. दाऊद फरफटत आणत असतानाही मोदी म्हणजेच केंद्र सरकार मात्र आपण फरफटत आणल्याचा दावा करत असल्याचं व्यंगचित्रातून दाखवण्यात आले. एक 'तर्क'चित्र काढत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा सरकारवर ताशेरे ओढले आहेत.