रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (15:52 IST)

ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली : अतुल भातखळकर

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतल आहे. त्यातच आता भाजप आमदार व मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी आपल्याला धमकावलं जात असल्याचा आरोप केला आहे.
 
अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान यानंतर आपल्याला धमक्या मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं असून ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली असल्याची टीका केली आहे. “पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे  धमक्यांचे फोन येत आहेत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे,” असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.