गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (17:55 IST)

पंढरपुरात मोक्षदा एकादशी साजरी, देवांना कपाळावर तुळशीपत्र लावले

पंढरपूरला  मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीनिमित्त श्री विठुराय आणि रूक्मिणीमातेच्या कपाळावर चंदन गंधासह तुळशीपत्रही लावण्यात आले. प्रत्येक एकादशीला देवांना कपाळावर असे तुळशीपत्र लावण्यात येते. तसेच थंडीमुळे कानपट्टी, उबदार शालही पांघरण्यात आली आहे. मार्गशीर्ष मास केशव मास म्हणून ओळखला जातो. म्हणून या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. 
 
हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व असते. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. अधिक मास आल्यास त्यात आणखी दोन एकादशींची भर पडून त्या २६ होतात. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असते. मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे, म्हणून काही ठिकाणी ती वैकुंठ एकादशीही म्हटली जाते.