शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (09:41 IST)

पंढरपूराच्या विठ्ठल रुक्मिणीच दर्शनाकरता ऑनलाईनची बुकिंग गरज नाही

पंढरपूराच्या विठ्ठल रुक्मिणीच दर्शन आता सर्वसामान्यांसाठी खुल करण्यात आल आहे. त्यामुळे आता दर्शनाकरता ऑनलाईनची बुकिंग गरज नसल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूरकरांना दररोज सकाळी ६ ते ७ यावेळेत दर्शन घेता येणार आहे. ही मुभा येत्या ५ डिसेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती मंदिराच्या प्रशासनाने दिली आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सर्वच मंदिरे आणि प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने भाऊबिजेच्या शुभमुहूर्तावर सर्व मंदिरे आणि प्रार्थना स्थळे खुली करण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न होण्याच्या उद्देशाने बऱ्याच मंदिरांमध्ये ऑनलाईन बुकिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे पंढरपूरच्या मंदिराचा देखील त्यात समावेश होता. मात्र, आता हा निर्णय पंढरपूरच्या प्रशासनाने मागे घेतला आहे. ऑनलाईन बुकिंगची गरज नसली तरी देखील रहिवाशी पुरावा, आधार किंवा मतदान ओळखत्र असणे आवश्यक असणार आहे.