शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (09:28 IST)

राज्यात ५१८२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले

राज्यात गुरुवारी ५१८२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर ११५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५८% एवढा आहे.  तसेच ८०६६ नवे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १७०३२७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७०% एवढा झाला आहे. 
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ११०५९३०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८३७३५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५४८१३७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ५९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ओरडते. मुंबईत १४०७६ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १५१४० कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत. पुण्यात ऍक्टिव कोरोनाबाधितांचा आकडा हा १९८४१ इतका आहे.