रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (16:36 IST)

सुप्रिया सुळे यांना केंद्रातील राजकारणात रस, शरद पवार यांचे विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणास रस नसून त्यांना केंद्रातील राजकारणात रस असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
 
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमत्रीपदाबाबतची चर्चा फेटाळून लावली. “सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणात रस नसून त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झालं आहेत. त्यांना देशपातळीवरच काम करण्याची आवड आहे. प्रत्येकाची एक आवड असते. त्यांची आवड देशपातळीवरील कामात आहे,” असं शरद पवार म्हणाले.