1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 25 मे 2025 (16:26 IST)

मान्सून महाराष्ट्रात दाखल, शेतकऱ्यांना दिलासा

मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे.यावेळी तब्बल 12 दिवस आधी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.
मान्सून ने महाराष्ट्रात 12 दिवस आधीच प्रवेश केला असून शेतकरी बांधव आनंदात आहे. 
केरळ मध्ये मान्सून वेळेचं आधी दाखल झाला असून महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत मान्सून येण्याचा अंदाज होता. मात्र मान्सून ने आजच प्रवेश केला आहे. 
मान्सूनसाठी महाराष्ट्राची स्थिती पोषक आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये आज मान्सून दाखल झाला आहे. 
हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊसाची शक्यता वर्तवली आहे.  वेळेच्या पूर्वी राज्यात मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी 7 जूनच्या जवळपास मान्सूनचा राज्यात प्रवेश होतो मात्र आता 12 दिवसांपूर्वीच मान्सून राज्यात दाखल झाला आहे. पुढील काही तासांत मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे. 
मुंबई, उपनगर, ठाणे भागात सकाळपासून वातावरण ढगाळ आहे. हवामान विभागाने आज रविवारी मुंबई, ठाणे जिल्ह्यात यलो अलर्ट तर रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मान्सूनच्या आगमनाने शेतकरी आनंदात आहे. 
 
Edited By - Priya Dixit