1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2024 (16:50 IST)

यंदा देशभरात सरासरी पेक्षा जून ते सप्टेंबर जास्त पाऊस कोसळणार!

monsoon
देशात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असून लोक उकाड्याने हैराण झाले आहे. पावसाळा कधी येतो याची वाट शेतकरी बंधू आणि नागरिक पाहत आहे. यंदा भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी 27 मे रोजी पावसाचा दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून यंदा जून ते सप्टेंबर, या काळात देशभरात सरासरीपेक्षा जास्त टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
मोसमी पावसाच्या वाटचाली साठी स्थिती पोषक असून मान्सून नियोजित वेळेस केरळ मध्ये दाखल होईल. यंदा जूनच्या महिन्यात महाराष्ट्र आणि मध्यभारतात दमदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा जून ते सप्टेंबर या काळात राज्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं जून महिन्यात पावसाच्या सरी कोसळणार असं सांगितलं आहे. 
 
केरळ मध्ये पुढील पाच दिवसांत मोसमी पाऊस दाखल होणार असून जून महिन्यात भारतातील ईशान्य भागात कमी पावसाची शक्यता वर्तवली असून सरासरी 94 टक्के किंवा त्यापेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर भारतात, महाराष्ट्रासह मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
यंदा राज्यात जून मध्ये सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पावसाचा जोर जास्त असेल. तसेच जून महिन्यात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
 
  Edited by - Priya Dixit