मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यात मान्सून दाखल

मान्सूनची वाट बघत असणार्‍यांसाठी आता दिलासा देणारी बातमी म्हणजे राज्यात अखेर मान्सूनने हजेरी लावली आहे. महाराष्टात विविध भागात काल पाऊस सुरु झाल्यामुळे लोकं सुखावले आहेत. 
 
राज्यात भयंकर उष्णतेमुळे कहर केला असून गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाईला सोमोरे जाव लागत आहे. मान्सूननेही सक्रीय होण्यास बराच अवधी घेतला त्यामुळे सर्वबाजूला हाहाकार होता पण आता मान्सून सक्रिय झाल्यामुळे जरा काळजी दूर होत असताना दिसत असून शेती कामांना वेग येणार आहे.  
 
पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस पडणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या मान्सूनने जेव्हा राज्यात हजेरी लावली तेव्हा सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.