1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (08:17 IST)

‘या’ मुद्यावर गाजणार पावसाळी अधिवेशन

Monsoon Session of the State Legislature
राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज सोमवार पासून सुरू होत आहे. त्यापूर्वी  सुरू होणाऱ्या अधिवेशनाआधी सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप झाले. शिवसेनेत शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरले होते.आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर पावसाळी अधिवेशऩ गाजण्याची शक्यता आहे.
 
यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, “ठाकरे गट, शेकाप, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सर्व पक्षांनी बैठक घेऊन घटनाबाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर स्वारस्य नसल्याचं आम्ही कळवले आहे. अर्थात आम्ही चहापानावर आम्ही बहिष्कार घातलेला आहे.”महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंबादास दानवेंनी माध्यमांशी संवाद साधला.
 
कोणत्या मुद्यावर गाजणार पावसाळी अधिवेशन
अब्दुल सत्तार कृषीमंत्री असताना झालेलं वादग्रस्त धाड प्रकरण
संजय राठोड यांच्या कार्यालयावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप
राज्यातील अलीकडच्या काळातील जातीय आणि धार्मिक तणावाच्या घटना
विरोधी पक्षांमध्ये पाडली जाणारी फूट
समृध्दी महामार्गावरील वाढते अपघात
महिलांवरील अत्याचार आणि वाढती गुन्हेगारी
अनेक जिल्ह्यांत पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट
खारघरमधील महाराष्ट्र भूषण सोहळ्यात 14 जणांचा गेलेला बळी
 
Edited By - Ratnadeep ranshoor