शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 17 एप्रिल 2022 (15:15 IST)

खासदार अमोल कोल्हेने वरातीत वाद्याच्या ठेक्यावर डान्स केला

सध्या शिरूरचे खासदार अभिनेते अमोल कोल्हे यांचा एका लग्नसमारंभात निघालेल्या वरातीत ताल धरून डान्स करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या खासगी पीएचे लग्न नारायणगाव येथे होते.

राजकारणातलोक प्रतिनिधींचा संपर्क चांगला असल्यामुळे ते मतदारसंघातील संपर्कात किंवा इतर लग्नसमारंभात सहभागी होतात. शिरूर चे खासदार अमोल कोल्हे यांनी एका लग्नसमारंभात सहभागी होऊन वरातीत ताल धरून डान्स केला आहे. त्यांनी आपल्या खासगी पीएच्या लग्नात नवरदेवासह ताशा, पिपाणी असे ग्रामीण वाद्यावर ठेका धरत डान्स केला आहे. त्यांचा डान्सचा हा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. 
 
खासदार अमोल कोल्हे हे जनतेमध्ये खूप लोकप्रिय आहे. अमोल कोल्हे हे नेहमी चर्चेत असतात.  काही दिवसांपूर्वी ते बैलगाडी शर्यतीत घोडीवर बसले होते.त्यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्यामुळे वादात आले होते.