शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (23:08 IST)

खासदार राजीव सातव त्यांच्या प्रकृतीत सुधारणा

काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांना करोनाची लागण झाली असून सध्या पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली.
खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, ते उपचारांना साथ देत आहे. तसेच त्यांच्या ऑक्सिजन पातळीमध्ये देखील वाढ होत असल्याने त्यांना कुठे ही हलविण्यात येणार नसल्याचं राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी माहिती दिली. 
“राजीव सातव हे २५ एप्रिलला करोना उपचारासाठी जहांगीरमध्ये रूग्णालयात दाखल झाले. त्यांची सुरुवातीला तब्येत ठीक होती. पण अचानक प्रकृती बिघडली होती. आता त्यांच्या तब्येतीमध्ये पुन्हा सुधारणा होत असून, ऑक्सिजन पातळी देखील वाढली आहे,” अशी माहिती विश्वजीत कदम यांनी दिली.