सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2023 (08:10 IST)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे खासदार संजय राऊत यांची अजित पवारांवर टीका

sanjay raut
MP Sanjay Raut criticizes Ajit Pawar  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.  यावर आता राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले.
 
'त्यांनी साद घातली तर प्रतिसाद देणार', ठाकरेंकडे परतण्याबाबत शंभूराज देसाईंचे मोठे विधान...
 
राऊत हे फक्त बोलबच्चन आहेत. महाविकास आघाडीचे सरकार संजय राऊतांमुळेच पडले
राष्ट्रवादीचे उमेश पाटील म्हणाले, अजित पवारांची अक्कल काढणाऱ्या संजय राऊतांनी अगोदर मेंदू तपासून घेतला पाहिजे. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना फुटली. त्यांनी उद्धव ठाकरेंचं साम्राज्य उद्धस्त केलं, असा आरोपही पाटील यांनी राऊतांवर केले.
 
'संजय राऊत हे फक्त बोलबच्चन आहेत. महाविकास आघाडीचे सरकार संजय राऊतांमुळेच पडले, अजित पवारांना अक्कल शिकवणारा हे संजय राऊत एका निवडणुकीत जनतेतून आलेले नाहीत. अजितदादा विधानसेभेत देशातील सर्वात जास्त मतांनी निवडून आले आहेत, संजय राऊत यांना फक्त वर्तमानपत्रात लिहिण्याची अक्कल आहे. राऊतांनी शिवसेना फोडली, यांच्या तोंडाला चाप लावण्याची गरज आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी केली.    
 
'राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्याइतपत अजित पवार यांना अक्कल नाही. त्यांना दिल्लीतून आदेश आहेत. त्याप्रमाणे त्यांनी पक्षावर दावा केला, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. पण या संकटकाळात शरद पवार एकटे नाहीत. शिवसेना त्यांच्या साथीला आहे, असं सांगतानाच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना फोडून कुणाला जर मास्टरस्ट्रोक मारला असं वाटत असेल तर २०२४ ला आमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा येऊ द्यात, असे मास्टरस्ट्रोक काय असतात हे दाखवून देतो,असंही राऊत म्हणाले होते.