1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. MPSC permanently abolishes opting out option in recruitment process

मोठा निर्णय : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रियेत ‘ऑप्टिंग आऊट’ हा पर्याय कायमचा रद्द केला

मोठा निर्णय : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रियेत ‘ऑप्टिंग आऊट’ हा पर्याय कायमचा रद्द केला
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती प्रक्रियेत ‘ऑप्टिंग आऊट’ (भरती प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडणे) हा पर्याय कायमचा रद्द केलाआहे.  
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) उमेदवारांच्या हितासाठी आणि भरती प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून चर्चेत असलेला 'ऑप्टिंग आऊट' म्हणजेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय आता कायमचा रद्द करण्यात आला आहे.
 
या पर्यायाचा गैरवापर होत असल्याच्या, काळाबाजार आणि आर्थिक व्यवहाराच्या चर्चा/आरोपांमुळे हा निर्णय घेण्यात आला. यापुढे आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा आणि भरती प्रक्रियांसाठी हे पर्याय उपलब्ध राहणार नाहीत. भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि गैरवापरमुक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार २०२२-२३ पासून हा पर्याय सुरू करण्यात आला होता, पण आता तो पूर्णपणे बंद करण्यात आला.आता एकदा निवड झाल्यानंतर पद स्वीकारणे बंधनकारक राहील. भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि न्याय्य होण्याची अपेक्षा आहे. 
काय होता 'ऑप्टिंग आऊट' पर्याय?
पूर्वी, एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आणि मुलाखती झाल्यानंतर, अंतिम शिफारस यादी जाहीर होण्यापूर्वी उमेदवारांना एक संधी दिली जात असे. जर एखाद्या उमेदवाराची दुसऱ्या एखाद्या चांगल्या पदावर निवड झाली असेल, तर तो या प्रक्रियेतून स्वतःचे नाव मागे घेऊ शकत होता. यालाच 'ऑप्टिंग आऊट' म्हटले जाई.
Edited by-Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
LIVE: मुंबईतील दुकाने, हॉटेल्स आणि कार्यालयांवर मराठी फलक लावणे बंधनकारक; बीएमसीने एक महिन्याचा अल्टिमेटम दिला