शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (16:53 IST)

ST Worker Strike: एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

मिळालेल्या वृत्तानुसार, एसटीचं विलिनीकरण, पगारवाढ यासाह अनेक मुद्द्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटीचा संप सुरू आहे. राज्य सरकार (Maharashtra Government) आणि एसटी महामंडळाने 41 टक्क्यांची पगारवाढ दिल्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी संपावर ठाम आहेत. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी महामंडळाने 14 दिवसाची मुदत दिली होती. या मुदतीमध्ये काही कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. तर काही कर्मचाऱ्यांनी या नोटीस इकडे दुर्लक्ष केलं आहे .या सर्व कर्मचाऱ्यांचे बाबतीत पुढील कारवाई म्हणून महामंडळ त्यांना बडतर्फची नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलं नाही आणि दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
 
वरिष्ठ कार्यालयाकडून स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार आता बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना हा मोठा धक्का आहे.
 
परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शनिवारपर्यंत कामावर रुजू व्हा नाही तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे आजपासून या एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात होणार आहे.