सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (08:55 IST)

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार : दरेकर

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी जनतेनं आम्हाला आपलं मानलं. असं सांगितलं होतं. परंतु सरकारनं जनतेला आपलं मानलं नाही. २ वर्षात राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वातच नाहीये. परंतु यातून मार्ग काढू शकतं ते फक्त आमचं सरकार, असे प्रविण दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप सरकार नक्की येणार आणि वेळ आल्यावर आम्ही सत्तेत कधी येणार तेही सांगणार. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार, असं  दरेकर यांनी सांगितल  आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप सरकार नक्की येणार आहे. परंतु अशा गोष्ट जाहीरपणे सांगायच्या नसतात. कारण की आम्ही कधी येणार हे सांगितल्यावर ते अधिकच घटट् होईल. त्यानंतर वाद-विवाद सुरू होतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने काही गोष्टी व्हायला पाहिजेत. असं दरेकरांनी म्हटलं आहे.