नागपूर येथे उप्पलवाडीत भीषण आगीत 3 प्लॅस्टिक गोदाम जळून खाक
नागपुरातील कामठी रोड परिसरात उप्पल वाडीत भीषण आग लागण्याचे वृत्त मिळाले आहे. या भीषण आगीत 3 प्लॅस्टिकची गोदाम जळून खाक झाले आहे .आग इतकी भीषण होती की सर्वत्र धूर पसरले होते. आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.