आगामी दिवाळी सण लक्षात घेता लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रुपये येणार?
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात ₹३,००० रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. ही रक्कम वाढीव हप्ता नसून सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशी माहिती समोर आली आहे.
माहितनुसार ऑक्टोबर महिना अर्ध्याहून अधिक उलटला तरी अद्याप महिलांना सप्टेंबर महिन्याचा ₹१,५०० रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. आगामी दिवाळी सण लक्षात घेता, महाराष्ट्र सरकार सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ₹३,००० रुपये महिलांच्या खात्यात एकत्र वर्ग करण्याची शक्यता आहे. दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार की वेगवेगळे, याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा जीआर जारी करण्यात आलेला नाही. माहितीनुसार येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होऊन तारखा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

