शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई : गणेशोत्सव मंडळांना वीज पुरवठा खंडित करा

मुंबईत मंगळवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्व  गणेशोत्सव मंडळांना त्वरित वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. परिसरात पावसाचे साचल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये, या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सर्व गणेशोत्सव मंडळांना वीज पुरवठा खंडित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव मंडळानी जे सेवक नेमले आहेत त्यांना गणपतीच्या मंडपात हजर राहण्यास सांगावे, अशीही सूचना करण्यात आली आहे. शिवाय, ज्या गणेश मंडळाना काहीही मदत हवी असल्यास त्वरित समितीशी संपर्क साधावा व आपली माहिती कळवण्यास सांगण्यात आले आहे.  महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाचा नंबर - १९१६, २२६९४७२५ ते २७ यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.