शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

लालबागच्या राजाच्या चरणी सोन्याच्या मूर्ती अर्पण

मुंबईतील 'लालबागचा राजा' गणपती देश-विदेशात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या भव्य गणेशाची ओळख आहे. त्यामुळे त्याच्या चरणी सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य भाविकांपर्यंत अनेकांची प्रचंड गर्दी असते. या गणपतीच्या चरणी सोन्या- चांदीचे दागिने आणि मोठी रोकडी अर्पण होत असते.
 
आता एका भाविकाने 1 किलो 101 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या मूर्ती अर्पण केल्या आहेत. या दोन्ही मूर्तींची किंमत सुमारे 31 लाख 51 हजार रूपये आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका भाविकाने दानपेटीत या मूर्ती टाकल्या होत्या. या मूर्ती दान करणार्‍या भाविकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. लाखो भाविक बाप्पाकडे नवस करतात आणि ते फेडण्यासाठी त्याच्या चरणी लीन होतात. अशाच कुणीतरी भक्ताने नवस फेडण्यासाठी या मूर्ती अर्पण केल्या असाव्यात, असे म्हटले जाते. दरवर्षी लालबागचा राजाच्या चरणी भाविकांकडून कोट्यवधींची देणगी अर्पण केली जाते.