गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

का साजरा करतात महालक्ष्मीचा उत्सव?

भाद्रपद शुक्ल पक्षात महालक्ष्मीचा उत्सवही साजरा केला जातो. गणपतीच्या आगमनानंतर तीन दिवसांनी यांचे आगमन होते. दुसर्‍या दिवशी त्यांची पूजा केली जाते आणि पुरण पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. तिसर्‍या दिवशी त्यांचे विसर्जन केले जाते. पण काही लोकं हा प्रश्न पडतो की ज्येष्ठागौरी हा सण साजरा करण्यामागे कारण काय? तर ऐका त्यामागे एक कथा आहे... 
 
वर्षोंनुपूर्वी कोलासुर नावाचा एक राक्षस स्त्रियांना फार त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून स्त्रिया एकत्र झाल्या व त्यांनी ब्रह्मा, विष्णू, आणि महेश यांना प्रार्थना केली. त्यांनी या तीनही देवांना आपल्यावर आलेल्या संकटाची जाणीव करून दिली. त्यांचे संकट पाहून देवांनी हे काम विष्णूंची पत्नी महालक्ष्मी हिच्याकडे सोपविले. तेव्हा महालक्ष्मी हिने कोलासुराशी युद्ध केले व त्याचा नाश केला. महालक्ष्मी हिच्या कृपेने स्त्रिया संकटमुक्त होऊन सुखी झाल्या. देवीच्या त्या उपकाराचे स्मरण म्हणूनच महालक्ष्मी उत्सव साजरा केला जातो.

स्त्रिया मोठ्या आनंदाने गौरीची स्थापना करून त्यांना सजवतात. पक्वान्न तयार करतात. आणि सुख-समृद्धी आणि घरात भरभराटीची येवो अशी प्रार्थना करतात.