मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 20 ऑगस्ट 2023 (12:45 IST)

Mumbai -Goa Highway :मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे काढणार पदयात्रा

amit thackare
मुंबई गोवा महामार्ग दुरुस्तीचे काम गेल्या 12 -13 वर्षापासून रखडलेले आहे. मुंबई गोवा महामार्गाचे प्रश्न अजून सुटत नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली असून अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढणार आहे. अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. 

रखडलेल्या मुंबई गोवाच्या महामार्गाच्या बाबतीत मनसे ने आक्रमक भूमिका घेतली असून मनसे 23 ते 30 ऑगस्ट रोजी पदयात्रा काढणार आहे. ही पदयात्रा मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढणार येणार असून या पदयात्रेत मनसेचे कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे.
 
मनसे चे कार्यकर्त्ये या पदयात्रेच्या माध्यमातून या महामार्गाची दुर्व्यवस्था जनतेआणि महाराष्ट्र शासनासमोर मांडणार आहे. या पदयात्रेचे नियोजन तीन टप्प्यात केले जाणार असून पहिल्या दोन टप्प्यात पदयात्रा होणार असून तिसऱ्या टप्प्यात गावा -गावात जाऊन जमिनी विकू नका अशी जन जागृती अभियान होणार आहे. या पदयात्रेत अधिक लोकांनी सहभागी होण्याचं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.  




Edited by - Priya Dixit