मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जुहू चौपाटीवर बुडालेल्या पाचपैकी दोघांचा मृत्यू

मुंबईतील जुहू चौपाटीवर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पाच जण बुडाल्याची घटना समोर आली होती. पाचपैकी एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं होतं. तर यामध्ये दोघांचा बूडून मृत्यू झाला आहे. बेपत्ता अन्य दोघांचा शोध सुरु आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान शोध घेत आहेत. 
 
अंधेरी पश्चिम येथील डी. एन, नगरमध्ये डोंगरावर राहणारे फरदिन सौदागर (वय 17), सोहेल शकील खान (वय -17), फैसल शेख (वय 17), नाझीर गाझी (वय - 17) व वसीम सलीम खान (वय - 22) हे तरुण चौपाटीवर पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, समुद्राला भरती असल्याने ते पाचही जण बुडाले. मात्र यापैकी सुरक्षारक्षकांनी वसीम खानला वाचवले होते. तर आता सोहेल आणि फरदिन या दोघांचे मृतदेह सापडले असून दोन तरुणांचा शोध सुरु आहे.