1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. mumbai kalyan mahapalika

शिववडा गाडीचे अतिक्रमण अधिकाऱ्याला फासले काळे

mumbai kalyan mahapalika
अतिक्रमित जागेत असलेल्या शिववडापावची गाडी तोडल्याच्या रागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याला काळं फासल्याची घटना  घडली आहे. हे घटना  नवीन मुंबई म्हणजेच कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं मनपाच्या प्रभाग अधिकाऱ्याला काळं फासलं आहे. 
 
अधिकारी अरुण वानखेडे यांना शिवसेना चर्मकार सेनेचे अध्यक्ष श्यामराव क्षीरसागर यांनं काळं फासल आहे . या घटनेमुळे संतप्त झालेल्या महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कोंडून ठेवलं होत.  कोंडून ठेवल्यानंतर शिवसैनिकांना पोलिसांच्या महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी उपस्थितीतच मारहाण केल्याचा आरोप केला आहे.  महापालिकेत मोठा गोंधळ सुरु होता.याविरोधात आता काम बंद आंदोलन करू असे महापालिका कर्मचारी वर्गाने दिली आहे.
पुढील लेख
अल्लेप्पो शहरावर लष्कराने पूर्णपणे नियंत्रण मिळवले