रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (13:40 IST)

Mumbai : नेत्याचा भावाचा पबमध्ये राडा, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

pitai
नवी मुंबईत एका हॉटेलमध्ये एका पक्ष नेत्याच्या भावाच्या पबमध्ये दमदाटी केल्याची घटना घडली आहे. या हॉटेल मध्ये रात्रीची पार्टी सुरु असताना गाणं सुरु होत. तरुण नाचत होते. पब मध्ये पार्टी सुरु असताना या पार्टी मध्ये गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक देखील आले होते. या वेळी एका पक्षाच्या नेत्याच्या भावाने  पबमधील कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत दमदाटी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाला आहे. 
 
हे सर्व प्रकरण मुंबईतील पाम बीच गॅलरी या मॉल मधील सेव्हन्थ स्काय हॉटेलचे आहे. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे यांच्या भावाचा दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या वेळी अन्नू आंग्रे यांचे भाऊ राहुल आंग्रे यांनी पबच्या कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत चक्क धमकी दिली आणि खंडणीची मागणी केली. राहुल आंग्रे यांच्या काही साथीदारांनी हॉटेलची तोडफोड केली. 

या प्रकरणी एमपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit