बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत पहिल्याच पावसात जीवनवाहिनी मंदावली

पावसाची वाट बघत असलेल्या मुंबईकरांना आजा मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली. मात्र नेहमीप्रमाणे पावसामुळे वाहतूक सेवांवर परिणाम दिसून येत आहे.
 
धो-धो पावसामुळे मुंबईकर आनंदी झाले असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे ट्रॅफिकचा वेग मंदावला आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतून उशिराने धावत असल्यामुळे लोकांना त्रास सोसावा लागत आहे.
 
अनेक मार्गांवर ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झालेली आहे. हार्बर रेल्वे,  मार्गावरील वाहतूक पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहतूक सेवा सुमारे 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. इतर महामार्गावरही ट्रॅफिक खोळंबा आहे. तसेच नवी मुंबईच्या रस्त्यावर तीन फुटांपर्यंत पाणी साचलं असल्याची बातमी आहे.
 
तसेच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदानुसार पुढील काही दिवस मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबईतल्या धारावी परिसर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, मुलुंड, ठाणे, दादर अशा अनेक भागात पाणी साचलं आहे. तसेच आज दिवसभर मुसळधार पाऊस येण्याचा इशारा देण्यात आला आहे.